महाराष्ट्र

लातूर : तावरजा कॉलनी गॅस स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट

लातूर : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट होऊन यात फुगे विक्रेता ठार झाला आहे, तर ११ लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रविवारी रात्री रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि नातेवाईकांची भेट घेतली. जखमींवर योग्य त्या उपचाराबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या.

घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून जखमींवर डॉक्टर सर्वतोपरी इलाज करत आहेत. डॉक्टरांच्या टीमने तात्काळ उपचार सुरु केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. घटना घडल्यानंतर पोलिसांनीही ताबडतोब घटनास्थळी जावून जखमी बालकांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनीही फोनकरून रुग्णांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस घटनेची चौकशी करीत असून अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नयेत, यासाठी चौकशी अहवालानंतर जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago