महाराष्ट्र

इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली १०० पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता, बचावकार्य युद्धपातळीवर

रायगड : खालापूर तालु्क्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री १०.३० – ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत गावातील जवळपास ५० घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ५ मृतदेह सापडले आहेत. ढिगाऱ्याखाली १०० पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

इर्शाळवाडी आदिवासीबहुल गाव असून गाव डोंगरावर वसलेलं आहे. रात्री उशिरा गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच रसायनीला राहत असलेल्या तरुणांचा एक गट मदतीसाठी पोहोचला. रसायनीपासून इर्शाळवाडी ३ ते ४ किलोमीटर दूर आहे. गावात जायला लहानशी पायवाट आहे. पक्का रस्ता नाही. तिथे मोठ्या मशीन्स, वाहनं जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असून साधनांचा अभाव आहे. रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस होता. त्यामुळे मदतकार्यात बरेच अडथळे येत आहेत. येथील घरं १० फूट ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. हा ढिगारा सहजासहजी उपसता येणार नाही. त्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक आहे.

रात्री बाराच्या सुमारास स्थानिक तरुण मदतकार्यासाठी जात असताना त्यांच्या सोबतीला अग्निशमन दलाचे जवानही होते. दरम्यान, डोंगरावर चढत असताना बेलापूरहून आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी अचानक कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago