महाराष्ट्र

कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना पदभरतीत प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई

मुंबई : कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांचा ऊर्जा विभागाच्या तांत्रिक पदभरतीमध्ये प्राधान्याने विचार करावा. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, उपसचिव ऊर्जा सतीश सुपे, सातारा येथील अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी संदेश आयरे, पुनर्वसनचे उपसचिव धनंजय नायक, यासह कोयना जलविद्युत प्रकल्प येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऊर्जा विभागात भरती करताना डावलले जावू नये. कोणताही पात्र प्रकल्पग्रस्त भरतीपासून वंचित राहू नये यासाठी ऊर्जा, जलसंपदा तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व विभागांनी सर्वानूमते प्रस्ताव बनवावा. ऊर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेत जे प्रकल्पग्रस्त आहेत आणि ज्यांच्याकडे विहीत पात्रता आहे त्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे. कंत्राटी पदभरतीमध्ये या प्रकल्पग्रस्तांचा प्राधान्याने विचार करावा या विषयांचा यामध्ये समावेश करावा. सर्वसमावेशक प्रस्तावानंतर याबाबत निर्णय घेता येईल, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago