Konkan Railway Services Disrupted As Engine Derails
सिंधुदुर्ग : राजधानी एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरून कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगद्यामध्ये आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त हजरत निजामुद्दीन-मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल रेल्वे गोव्याच्या दिशेने जात होती. मुंबईपासून सुमारे ३२५ किलोमीटरवर असलेल्या करबुडे बोगद्यातील ट्रॅकवर दरड कोसळल्याने इंजिन रुळावरून खाली घसरले आणि हा अपघात झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रेल्वेची देखभाल दुरुस्ती करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली असून वैद्यकीय सुविधा देखील रत्नागिरीहून घटनास्थळी पोहोचवण्यात आल्या आहेत. या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे. मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…