Kolhapur Boy Electrocuted During Cricket Ball Retrieval
कोल्हापूर : खेळताना नकळत झालेला निष्काळजीपणा मुलांसाठी किती घातक ठरू शकतो, याचा प्रत्यय करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथे आला. एका सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा क्रिकेटचा चेंडू आणताना उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (५ डिसेंबर) दुपारी घडली.
मृत मुलाचे नाव मोहम्मद अफान असिफ बागवान (वय 13, रा. बालाजी पार्क, उजळाईवाडी) असे आहे. तो मित्रांसोबत विमानतळ रोडलगत मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत होता. शिक्षकांच्या संपामुळे शाळेला अघोषित सुट्टी असल्याने तो घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता.
क्रिकेट खेळताना चेंडू शेजारच्या हनुमंत खांडेकर यांच्या बंगल्याच्या टेरेसवर गेला. तो आणण्यासाठी अफान टेरेसवर चढला. याच वेळी इमारतीच्या अवघ्या दीड ते दोन फूट अंतरावरून जाणारी 11,000 व्होल्ट (11kV) क्षमतेची उच्चदाब विद्युत वाहिनी त्याच्या मानेला स्पर्शली आणि प्रचंड विद्युत धक्का बसताच अफान जागीच कोसळला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आवाज येताच लोक धावले आणि अफानला तातडीने सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शेंडा पार्क येथे शवविच्छेदनासाठी पाठवला असून, गोकुळ शिरगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
अफान हा स्वभावाने मनमिळावू आणि अभ्यासात हुशार होता. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनाने घरावर दुःखाचे सावट पसरले आहे. वडील असिफ बागवान हे खासगी कंपनीत नोकरीबरोबरच पार्टटाईम रिक्षाचालक आहेत, तर आई गृहिणी असून दोन लहान मुली आहेत.
“शाळा सुरू असती तर ही दुर्घटना टळली असती,” अशी हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत सुरक्षिततेसंबंधी प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी महावितरणकडून तातडीने चौकशी करून उच्चदाब वाहिन्यांचे सुरक्षित अंतर पाळले जात आहे का, याबाबत तपासणी करण्याची मागणी केली आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…