कोल्हापूर

कार दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना, कोल्हापूरातील 2 तरुण जागीच ठार, 2 जखमी

कोल्हापूर : कार २५ फूट खोल दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोल्हापूरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हेमंत सोनार (वय २४ रा. राजारामपूरी) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय २८ रा. मोरेवाडी, ता. करवीर) अशी ठार झालेल्या दोघांची नावे असून संकेत बाळकृष्ण कडणे (२१ रा. खाडीलकर गल्ली, गावभाव, सांगली), सौरभ रविंद्र कणसे (२६ रा. राजारामपूरी ६ वी गल्ली) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. हे चौघे आपल्या इनोव्हा गाडीतून वाशी येथे गेले होते. तेथे फार्म हाऊसवर जेवण करून मध्यरात्री चौघेही घरी परतत होते. शुभम भरधाव कार चालवत असल्यामुळे पुईखडी टेकडीवर आल्यानंतर शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यावरून खाली जाऊन सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली.

या दुर्घटनेत शुभम सुतार व शंतनू कुलकर्णी हे दोघे जागीच ठार झाले. तर संकेत कडणे व सौरभ कडणे हे दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घरातील तरूण मुले गमावल्याने शुभम आणि शंतनूच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

15 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago