महाराष्ट्र

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला काडीचाही अर्थ नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेत असताना आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काडीचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असं म्हटलं आहे. याच वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की, कर्नाटक सीमेवरील ज्या गावांबाबत वाद आहेत, ते वाद मिटत नाहीत, तोपर्यंत ते केंद्रशासित करा. या मागणीचा आणि मुंबई केंद्रशासित करा या मागणीचा काही अर्था-अर्थी संबंध आहे का? पुढे बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला काडीचाही अर्थ नाही. आपल्याला लागून असलेल्या मराठी भाषिक गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये अनेक वर्ष आमदार निवडून येत होते. तिथला महापौरही मराठी भाषिक असायचा. तिथल्या लोकांची मागणीही तशाच पद्धतीची होती. हे निवडणूकीद्वारे अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केली. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली. असं करुन तिथलं मराठी भाषिकांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago