जळगाव

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरले

जळगाव : आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. भुसावळहून नंदूरबारकडे निघालेली मालगाडी या स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून खाली घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे सात डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आणि अस्ताव्यस्त झाले आहेत.

दुर्घटना अमळनेर स्थानकापासून अगदी जवळच, प्रसिद्ध प्रताप महाविद्यालयाच्या बाजूला घडली. या दुर्घटनेत लोको पायलट आणि गार्ड हे सुरक्षित आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे समोरून दुसरी रेल्वे गाडी आली असती तर आणखीन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सगळीकडे या घटनेची चर्चा सुरु आहे.

या दुर्घटनेमुळे सुरत ते भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, विशेषतः जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतील नागरिक सुरत येथे वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या अपघातामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

दुर्घटना घडल्यावर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, मात्र वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास अजून काही वेळ लागू शकतो. अद्याप अपघात कसा झाला याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु, अपघातामुळे रेल्वे रुळांना मोठा नुकसान झाल्याने दुरुस्तीमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना वैकल्पिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास सूचित करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago