जळगाव

धक्कादायक : भाजपाचे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलीसमवेत आत्महत्या

जळगाव : भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील यांनी पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केली आहे. त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. राजेंद्र रायभान पाटील (वय ५४), पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय ४८), मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील (वय २१) अशी मृतांची नावे आहेत.

राजेंद्र पाटील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावचे रहिवाशी होते. राजेंद्र पाटील, त्यांची पत्नी व मुलगी हे तिघे त्यांच्या इंडीका कारमध्ये सोमवारी (दि.१७) सकाळी अमळनेर तालुक्यातील भरवस येथे त्यांच्या सासरवाडीला गेले होते. तिकडून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते घरी परतण्यासाठी निघाले. मात्र, ते घरी पोहचलेच नाही. दरम्यान, संध्याकाळी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळ तापी नदीवर असलेल्या पुलावर दिसली. त्यानतंर काल (दि. १८) दुपारी ४ वाजता एक मृतदेह तापीत तरंगतांना आसपासच्या लोकांना दिसला.

जिल्हा बँकचे संचालक संजय पवार यांनी राजेंद्र पाटील यांची गाडी ओळखली. त्यानंतर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत राजेंद्र पाटील यांच्या मुलीचाही मृतदेह तरंगतांना दिसला. रात्र झाल्यामुळे या दोघांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत. आज सकाळी हे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. आज सकाळी त्यांच्या पत्नीचा देखील मृतदेह तरंगताना आढळला. तिन्ही मृतदेह बाहेर काढून शिरपूर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

राजेंद्र पाटील यांच्या सहकुटूंब आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. राजेंद्र पाटील हे अतिशय संयमी म्हणून परिचित होते, त्यांनी पत्नी व मुलीसह आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. त्यांच्या कारमध्ये डेलीगेट या किटकनाशकाची बाटलीही सापडली आहे. मात्र ती उघडलेली नाही. त्यांची पत्नी वंदना या भोद ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. मुलगी ज्ञानल धरणगाव महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत होती. त्यांचा मुलगा तेजस शेतकी संघात नोकरीला असल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर कोणाचा दबाव? ‘त्या’ कथित गोळीबार प्रकरणाचं पुढे काय?

दोन मोटारसायकल समोरासमोर धडकून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago