नागपूर : जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नुतनीकरण नियमानुसार करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुरेश भोळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, या गाळेधारकांच्या भाडेपट्टयांच्या नुतनीकरणाबाबत भाडे व सुरक्षा ठेव निर्धारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने भाडेपट्टा दर निश्चित केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दर दोन किंवा तीन टक्के करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जळगाव महापालिकेने कार्यवाही केली असून त्याचा अहवाल शासनास प्राप्त झाला असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…