It will speed up the construction of Marathi language university – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
मुंबई : मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वडाळा येथील महानुभाव श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले व पूजाही केली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कविश्वर कुलभूषण आचार्यप्रवर श्रीविजयराज बाबा शास्त्री, राणीबाईजी शास्त्री, राहुलदादाजी महानुभाव, धर्मकुमार प्रसाद महानुभाव तसेच आनंद मेमोरियल चक्रधर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथाचे कार्य मोठे असून हे कार्य आज सर्वत्र पोहोचले आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर श्री कृष्ण चरित्रात आपल्याला मिळते. त्यातून ऊर्जा मिळते तसेच जगण्याची दिशाही मिळते. महानुभाव पंथाच्या विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सोयी सुविधा उभारण्याच्या कामांनाही वेग देण्यात येत आहे. या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करुन भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…