महाराष्ट्र

अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी; कल्याणीनगर अपघात प्रकरणात सखोल तपास

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाबरोबर पबमधील पार्टीत सामील झालेल्या १५ मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. उर्वरित ४८ हजारांचे बिल अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती चौकशीत मिळाली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने २५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. १९ मे रोजी कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर याप्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, आजोबा सुरेंद्र, तसेच ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, पबमध्ये मुलांना मद्य विक्री करणारे पबमालक, कर्मचाऱ्यांना अटक केली.

अपघातापूर्वी अल्पवयीन मुलगा पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेला होता. तेथे अल्पवयीन मुलासह त्याचे मित्र होते. त्यांनी तेथे मद्यप्राशन केले. पार्टीत सामील झालेल्या १५ मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये आणले होते. उर्वरित ४८ हजार रुपये अपघात करणाऱ्या मुलाने पबमध्ये जमा केल्याची माहिती चौकशीत मिळाली. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago