महाराष्ट्र

मुंबईत जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

मुंबई : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

मंत्री महाजन यांनी आज दुपारी उद्योगपती महिंद्रा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुंबईसह राज्यातील पर्यटनाच्या वृध्दीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. यानिमित्त मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी महिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय या फाऊंडेशनमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते सचिन पिळगावकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे.

देश- विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई शहराचा इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, खरेदी, चित्रपटसृष्टी, संगीत, कला, क्रीडाविषयक माहिती पर्यटकांना देण्यात येईल. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या विस्ताराला मदत होईल. या फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या कालावधीत देश- विदेशातील पर्यटक मुंबईसह राज्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे पर्यटनासह पर्यटनावर आधारित व्यवसायांचा विस्तार होईल, असाही विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago