महाराष्ट्र

राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिनाबाबत निर्देश; परिपत्रक जारी

मुंबई : राष्ट्र पुरुष / थोर नेत्यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम यावर्षी मंत्रालय व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या परिपत्रकामध्ये दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, शनिवारी व रविवारी येत असले तरी, ते कार्यक्रम त्या त्या दिवशी साजरे करण्यात यावेत. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्या जयंतीदिनी सर्व शाळा / महाविद्यालये येथे जयंती साजरी करताना संबंधित राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांनी देशासाठी केलेल्या अनमोल कार्याची सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या अनुषंगाने व्याख्याने, निबंध स्पर्धा अशाप्रकारचे विविध कार्यक्रम शाळा तसेच महाविद्यालयात आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन भावी पिढीला राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांनी देशासाठी केलेल्या महान कार्याची माहिती होईल, तसेच जयंती दिन सुट्टीच्या दिवशी येत असल्यास शाळा / महाविद्यालये यांनी राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांच्याबाबत व्याख्याने, निबंध स्पर्धा अशाप्रकारचे विविध कार्यक्रम सुट्टीच्या आदल्या दिवशी आयोजित करण्याच्या सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त महानगरपालिका यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील / महानगरपालिकेतील सर्व शाळा / महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 5 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेले हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२२०९०६१५५३१३०२०७ असा आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago