महाराष्ट्र

Ind vs Eng 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सामने आजपासून होणार सुरु.. जाणून घ्या.

पुणे : India vs England 1st ODI – भारत-इंग्लंड संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियवर सुरुवात होत आहे. दुपारी दीड वाजता होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना आज, तर उर्वरित दोन सामने 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येतील. ही मालिका जिंकून इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. तर शिखर धवनच्या भावी कारकीर्दीच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे वनडे मालिका रिकाम्या स्टेडियममध्येच खेळली जाईल. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने दुपारी दीड वाजता सुरू होतील.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  1. पहिला वनडे – 23 मार्च  पुणे येथे दुपारी दीड वाजता.
  2. दुसरा वनडे – 26 मार्च  पुणे येथे दुपारी दीड वाजता.
  3. तिसरा वनडे – 28 मार्च  पुणे येथे दुपारी दीड वाजता.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago