Inauguration of e-Bill and Voucher Project System by Deputy Chief Minister Devendra Fadnavis
मुंबई : गतिमान ई-प्रशासनासाठी विकसित करण्यात आलेल्या ई- बिल आणि व्हाउचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात करण्यात आले. वित्त विभागांतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे, यांचेमार्फत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव ओ पी गुप्ता, प्रधान सचिव आभा शुक्ला. प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सचिव (वित्त) शैला ए उपस्थित होते. यावेळी वित्त व नियोजन विभागामार्फत राज्याचे स्थूल उत्पन्न, महसुली जमेचे स्त्रोत, महसुली व भांडवली खर्च, विकास कार्यक्रम, दायित्व, केंद्र पुरस्कृत विविध योजना, जीएसटी संकलन, जिल्हा वार्षिक योजना, मानव विकास कार्यक्रम, आकांक्षित जिल्हे, शाश्वत विकास ध्येय, यासंबंधी सादरीकरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्याने नेहमीच नाविन्यपूर्ण, लोकाभिमूख संकल्पनांचा अंगिकार करून संपूर्ण देशासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. ई- बिल आणि व्हाऊचर प्रोजेक्ट्स ही प्रणाली अतिशय उपयुक्त ठरणार असून. आता अधिक डिजिटल पद्धतीने कोषागारांचे कामकाज होईल. लवकरच हे कामकाज पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होईल. हे कामकाज विश्वासार्ह तर असेलच तसेच वेळ वाचवणारेही असेल. ही प्रणाली वरचेवर अधिक बळकट आणि अद्ययावत करण्यात यावी. या प्रणाली कार्यान्वयनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने देशातील पहिल्या ई- बिल आणि व्हाऊचर सुविधेचा व्यापक प्रमाणावर वापराचा केलेला संकल्प अत्यंत स्तुत्य असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उत्पादन क्षेत्रावर भर देऊन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करु
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून यापुढे कृषी क्षेत्राबरोबरच उत्पादन क्षेत्रावरही विशेष भर देऊन सेवाक्षेत्राला अधिक गती देण्यात येईल. विविध क्षेत्रातील विकास प्रकल्प आणि विशेष क्षेत्र निवडून त्यामधील गुंतवणुकीद्वारे देशाचे 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची गरज आहे.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि ग्रामीण रस्त्यांसाठी नाबार्डच्या योजनांची मदत घेण्यात यावी. असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जनसामान्यांच्या आणि सर्वच क्षेत्रांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ई- बिल आणि व्हाऊचर प्रोजेक्ट्स प्रणाली
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…