महाराष्ट्र

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ५४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोबर रोजी कारवाई केली.

यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 अशा एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 54 लाख 48 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे 35 लाख 73 हजार 400 व मुंब्रा येथे 18 लाख 75 हजार 200 रूपयांचा समावेश आहे.

या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये 3 टेम्पो वाहने, 2232 किलो भांग मिश्रीत पदार्थ, परराज्यातील भारतीय बनावटीचे 120 बॉक्स विदेशी मद्य आदींचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. मुंब्रा येथील कारवाई ठाणे अधिक्षक प्रवीण तांबे, उपअधीक्षक वैद्य, पोकळे, ए. डी देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. चेंबूर येथील गुन्ह्यामध्ये दुय्यम निरीक्षक विशाल सकपाळ, रिंकेश दांगट, हनुमंत यादव, सहा. दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, जवान केतन वझे, भाऊसाहेब कराड, हनुमंत गाढवे, विजय पाटील, नारायण जानकर, श्रीराम राठोड, अमित सानप, कुणाल तडवी यांनी कारवाई केली. तसेच मुंब्रा येथील कारवाईमध्ये निरीक्षक एम.पी धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, दुय्यम निरीक्षक एस. आर मिसाळ,सहायक दुय्यम निरीक्षक बी. जी थोरात, जवान खेमनर, आर. एस पाटील, पी. ए. महाजन, पी. एस नागरे, एम. जी शेख, श्रीमती एस.एस. यादव यांनी सहभाग घेतला, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago