महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात सात वर्षीय मुलासोबत शिक्षिकेने केले भयंकर कृत्य, नावाजलेल्या शाळेतील प्रकार

पुणे : विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. विमाननगर परिसरातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार घडला आहे. कोमल असे यांशिक्षिकेचे नाव असून या प्रकरणी विद्यार्थ्याचे वडील अश्रफ मेहबूब शरीफ यांनी विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील वडगाव शिंदे रस्त्यावर हे इंग्लिश मिडीयम स्कूल आहे. या स्कूलमध्ये अरहन शरीफ(वय ७) हा शिकत आहे. १५ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या मुलाचे आणि शाळेतील काही मुलांचे भांडण सुरू होती. ही गोष्ट शिक्षिकेला समजल्यानंतर म्युजिक टीचर असलेल्या शिक्षिकेने अरहान याचे तोंड जोरात दाबून धरले. त्याला मारहाण केली. त्याचे भिंतीवर दोन वेळा डोके आपटले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला क्लास मधून काढून टाकेन अशी भीती घातली दिली.

ही घटना घडल्यानंतर अरहान हा दबावाखाली होता. त्यामुळे तो आजारी पडला. याबाबत त्याच्या वडिलांना शंका आल्याने त्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी विमानतळ पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago