In Nanded Child Died Due To Fear Of Monkey
नांदेड : नांदेडमध्ये मुदखेड तालुक्यातील बारड गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. माकडाबद्दल वाटणाऱ्या भीतीमुळे एका १० वर्षीय चिमुकल्याचा बळी गेला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वीर नागेश संगेवार हा १० वर्षांचा मुलगा घरासमोर खेळत होता. त्यावेळी अचानक एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. अंगावर माकड बसल्याने वीर खूप घाबरला. त्याने या प्रकारची भयंकर धास्ती घेतली. भीतीमुळे त्याला ताप भरला. त्यानंतर त्याला तातडीने नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र, त्या सर्व नॉर्मल आल्या.
सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर डॉक्टर वीरबरोबर बोलले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वीरच्या मनात माकडाविषयी खूप भीती होती. माकड त्याच्या अंगावर बसल्यामुळे त्याच्या मनात धास्ती निर्माण झाली होती की माकड पुन्हा येईल. यामुळेच त्याला तापही आला होता. भीतीमुळे त्याचा १३ ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…