Adar Poonawala announces price and availability of Corona vaccine
मुंबई : पूर्ण “लसीकरण” झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून यात 18 वर्षाखालील व्यक्ती तसेच वैद्यकीय कारणामुळे लस न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे.
राज्य शासनामार्फत जारी आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने विविध सेवा प्रदाता तसेच सेवा प्राप्त करणारे यांच्यासाठी कामाची परवानगी देण्यात आली असून त्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीच्या व्याख्येमध्ये अशा लोकांचा समावेश होतो की ज्यांनी भारत सरकारद्वारे निर्देशित दोन्ही लशी ठराविक कालांतराने घेतलेल्या आहेत आणि दुसरी लस घेऊन त्यांना चौदा दिवस लोटले आहे.
परंतु असे निदर्शनास आले आहे की, अनेक प्रदाते व सेवा घेणाऱ्या लोकांची इच्छा असताना सुद्धा वैद्यकीय कारणामुळे किंवा त्यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे ते लस घेऊ शकत नाही. अशा नागरिकांना ही सेवा देण्याची किंवा सेवा प्राप्त करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे. त्यानुसार लसीकरण झालेल्या लोकांच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली आहे.
खालील तीन वर्गातल्या व्यक्तींना “पूर्ण लसीकरण” झालेले व्यक्ती म्हणून गृहीत धरले जाईल:
भविष्यात जर या वयोगटासाठी लस उपलब्ध केली गेली तर लस उपलब्धतेच्या नंतरही ६० दिवसांसाठी ही सुधारणा अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…