महाराष्ट्र

रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील रूग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही, त्यांचे प्राण वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सुभाष देशमुख यांनी अधिवेशन कालावधीदरम्यान विधिमंडळ परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तसेच मुंबईतील रूग्णालयाच्या स्थितीसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यासंदर्भात तत्काळ निधी उपलब्ध करून देणे, सल्लागार समिती गठित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनास दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता तसेच त्यांच्यासंबंधीत इतर समस्या सोडविण्यासाठी सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago