महाराष्ट्र

परळीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, ४०० व्यक्तीहून अधिक व्यक्तींनी घेतला लाभ

परळी : श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली थोरला मठ संस्थान वसमत आयोजित वसमत ते श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रा मागिल १२ वर्षा पासुन आयोजित करण्यात येते . हजारो भाविकांचा त्या पदयात्रेत सहभाग असतो. या वर्षी भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले त्यात ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी घेतला शिबिराचा लाभ  घेतला.

रेवली फाटा, परळी जिल्हा बिड येथे डॉ भाग्यश्री नरवाडे (एम.डी.आयुर्वेद) यांच्या तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तपासणी व समुपदेशनाचा सुमारे ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात मोफत रक्तदाब, मधुमेह तपासणी, सांध्यांचे विकार , हृदयरोग, मूत्त्राशयाचे आजार, अजीर्ण-अम्लपित्त, बालरोग, स्त्री रोग, इत्यादी प्रकारच्या अजारांवर डॉक्टरांनी मोफत उपचार, औषधे व सल्ला दिला.

डॉ भाग्यश्री नरवाडे यांनी सांगितले की, बहुतांश आजारांचे कारण चूकीचा आहारविहार असतो. आयुर्वेद भारताला मिळालेला खजिना आहे, आयुर्वेद हा अथर्वेदाचा उपवेद असून यात जीवन जगण्याचे महामंत्र दिलेले आहेत. आयुर्वेदातील दिनचर्या – ऋतुचर्या पालन केल्यास डिसऑर्डर जसे की उच्चरक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार उत्पन्न होणार नाहीत किंवा आजार उत्पन्न झाल्यास आजार दुरुस्त होण्यास नक्कीच मदत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णु राठोड, डॉ.शरद चोले, लॅब टेक्निशिअन व त्यांना अशोक कूबडे, छाया कुबडे, विश्वनाथ कंधारकर वैजनाथ नरवाडे इंजि. आशीष कुबडे, इंजि.सुनिता कुबडे, शुभम कंधारकर अमर नरवाडे व पदयात्रिल स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago