har har mahadev show stopped ncp 100 workers filed a case in the police station
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी आता 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.
हरहर महादेव सिनेमामावरून राष्ट्रवादीचे आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट न बघण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण केली होती. या प्रेक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हटले कि, इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची पुरंदरी परंपरा आहे. ब. म पुरंदरेंनी महाराष्ट्रात सुरू केलं ते आता सिनेसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालं आणि त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण असे विकृत सिनेमे महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहिररित्या सांगतो.
दरम्यान, विविआना मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांनी बंद पडलेला चित्रपटात झालेल्या प्रकरणावरून ठाण्यातील वर्तक नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहे. 141, 143, 146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 इत्यादी कलम लावण्यात आले आहेत. फिर्यादी प्रेक्षक विजय दुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिनेमा बंद पाडल्यामुळे दुर्वे यांनी तिकीटाचे पैसे मागितले होते. दुर्वे हे मनसेचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…