महाराष्ट्र

मोठी बातमी! पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील ‘या’ तारखेपर्यंतची गुंठेवारीची प्रकरणे नियमित होणार

मुंबई, दि. ३ – पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरातील विविध विकासकामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी या दोन्ही महापालिका आयुक्तांना दिले. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या नियमांची अंमलबजावणी अजूनही सुरु झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने, याबाबत शासनाने सर्व मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार आलेल्या प्रस्तावावर नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करावी, तसेच कोणत्याही गुंठेवारीधारकास गुंठेवारी नियमित करण्याची इच्छा असल्यास त्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. यानंतर पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून भरतीसाठी पदांच्या आकृतिबंधाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना दिले.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत योजना अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचे समजले. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी या योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना दिले.तसेच ही योजना पूर्ण होईपर्यंत देखील शहरातील नागरिकांना एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago