महाराष्ट्र

शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अमिन पटेल यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान मुंबईतील शासकीय रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत 15 दिवसात बैठक घेण्यात येईल. या रुग्णालयातील सोयी सुविधांवर केलेल्या खर्चाचीही उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तसेच धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांसाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी होते की नाही, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल. ग्रामीण भागातून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची समस्या सोडवण्यासाठीही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत ॲड. आशिष शेलार, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago