Dr. Sujay Vikhe Patil inaugurates the sale of flowers, garlands, and offerings at Shirdi Sai Baba Temple, bringing relief and joy to farmers and devotees alike.
शिर्डी – उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्रीला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षे फुले विक्रीसाठी लढा दिला होता, आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे.
फुलशेती हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. परंतु, साई मंदिरात फुले आणि हार विक्रीवर घालण्यात आलेली बंदी त्यांच्या आर्थिक स्थितीसाठी मोठे आव्हान ठरली होती. आता या विक्रीस मंजुरी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज साई मंदिर परिसरात विक्री स्टॉल्सचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. कोरोना महामारीच्या काळात साई मंदिरात हार आणि फुले नेण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार व साई संस्थेच्या नियमानुसार आता ही परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकरी आणि साईभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, देशभरातील आणि जगभरातील साईभक्तांची श्रद्धा आणि इच्छा होती की साई समाधीपर्यंत हार-फुले पोहोचावीत. ती श्रद्धा आणि आस्था आता पूर्ण झाल्यामुळे भक्तांमध्येही आनंदाचे वातावरण आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…