महाराष्ट्र

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेळी-मेंढीपालन सर्वोत्तम पर्याय

पुणे : ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकरी, शेजमजुराला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आवश्यक असून शेळी-मेंढीपालन हा त्यावर सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

केदार म्हणाले, ग्रामीण भागात शेळय़ा-मेंढय़ा असलेल्यांकडे चांगला उत्पन्नाचा स्त्रोत आहे. शेळीचे वजन वाढवणे आणि अधिक दूध देणारी शेळीची प्रजाती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याकडे सध्या देशी शेळीचे वजन २० ते २५ किलो आहे. त्यांचे वजन किमान ६० किलोपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. शेळीची दूध देण्याची क्षमता वाढवण्याचाही प्रयत्न आहे. यामध्ये यश आले तर ग्रामीण अर्थव्यवस्था नक्कीच सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना कालावधीत आर्थिक अडचण असतानाही कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाने चांगले काम केले. विभागाचे स्थान कायम उंचीवर राहील, असाच आपला प्रयत्न आहे. पशुसंवर्धन विभागात संशोधन व विकासाला संधी आहे. शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील अधिकारी आहेत, त्यामुळे आपल्या गावातील पशुपालक शेतकऱ्यांना तसेच विभागाला नवीन दिशा कशी देता येईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुचिकित्या केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोरोना कालावधीतही पशु पालकांनी चांगली सेवा देण्यात आली. या कालावधीत कुक्कुटपालन व्यवसायाने उभारी घेतली आहे. कोरोना कालावधीत प्रयोगशाळेची गरज लक्षात घेत शासनाने तत्परतेने त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून काम प्रगतीपथावर आहे. पशुसंवर्धन विभागाने ‘सुंदर माझे कार्यालय’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कार्यालयाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यावेळी पशुसंवर्धन विभागातील ८२ अधिकाऱ्यांचा गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

लोकर वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन
तत्पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत सुरू करण्यात आलेल्या लोकर वस्तु विक्री केंद्राचे उदघाटन मंत्री केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून लोकर उत्पादने तसेच शेळीचे दुध व पुरक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक शशांक कांबळे यांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago