महाराष्ट्र

मुंबई – गोवा महामार्गावर गॅस टँकर उलटला, सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी नाही

मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गॅस टँकर उलटण्याच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम)च्या वतीने कळविण्यात आले आहे.

महामार्गावरील हातखंबा पुनर्रचना विभागात आज सकाळी 9.30 वाजता गॅस टँकर अतिवेगामुळे उलटला. या दुर्घटनेबाबत प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. टँकरजवळ उभ्या असलेल्या लहान चहाच्या स्टॉलवर (टपरी) आणि तेथील 3-4 दुचाकींवर तो उलटला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तेथील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. कंत्राटदार कंपनी कडून पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व यांत्रिक मदत पुरवली आहे आणि टँकर उचलण्याचे काम सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago