महाराष्ट्र

यंदाही गणेशोत्सव साधेपणाने, कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश काढले आहेत. मुंबई महापालिकेने 16 टक्के गणेश मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या अगोदर 3000 पेक्षाही अधिक मंडळं मंडप उभे करण्यासाठी परवानगी मागायचे. यावर्षी एकूण 1273 मंडळांनी मंडप उभे करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यापैकी केवळ 519 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी असे असतील निर्बंध

  1. मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मूर्तीची उंची जास्तीत जास्त 4 फूट आणि घरगुती गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त 2 फूट असावी, असं म्हटलं आहे.
  2. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
  3. मंडळांनी मूर्तींचं ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावं आणि गर्दी टाळावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
  4. एका वेळी मंडपात जास्तीत जास्त 5 कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे.
  5. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
  7. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago