महाराष्ट्र

सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटनस्थळ विकासासाठी अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पर्यटनस्थळ विकासासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी नगराध्यक्ष ॲड. नजीर काझी यांच्यासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केलेली विनंती दोघांनीही मान्य केली. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या स्थळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथे 16 पर्यटनस्थळे आहेत त्यापैकी पाच स्थळे केंद्राच्या अखत्यारितील पुरातत्व विभागाकडे आहेत. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर म्हणून हे स्थळ ओळखले जाते. याशिवाय हिंदूराजे लखोजी राव यांचा राजवाडा, रंगमहाल, निळकंठेश्वर मंदिर यासाख्या स्थळांमुळे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. औरंगाबाद जिल्ह्यातील अजंठा, एलोरा, दौलताबाद, व इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. पर्यटन विकासासह वारसा जतन करण्यासाठी लागणारे सहकार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला करण्यात येईल यासंदर्भात राज्याचे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago