महाराष्ट्र

‘स्वराज्य महोत्सवा’साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी

मुंबई : “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाअंतर्गत राज्यात साजऱ्या होणाऱ्या “स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून 30 जून रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” साजरा होणार आहे. याअंतर्गत तालुका व ग्रामस्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी राज्यातील 358 तालुके व 351 पंचायत समित्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. 12 मार्च, 2021 पासून देशभरात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” हा उपक्रम सुरु झाला असून या अंतर्गत ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago