Fire at Navbharat Industrial Company in Navi Mumbai, 5 vehicles of fire brigade reached the spot
नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. आग इतकी भीषण आहे की, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आगीचे लोट हे रस्त्यापर्यंत पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक देखील आगीवर नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दुरवर धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत. नवी मुंबईतील MIDC मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिची मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…