महाराष्ट्र

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम, ‘येथे’ करा अर्ज…

मुंबई : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या 120 महिला उद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी २०२२ असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण ८ मार्च २०२२ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू होईल. प्रशिक्षणामध्ये उद्योगाचा विकास कसा करावा यासह स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत आपली कल्पना कशी “पिच” करावी अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले.

“महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण उपक्रम” या नावाने हा उपक्रम राबविण्यात येत असून यातून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या नवीन व्यवसायाचे सक्षम उद्योगात रूपांतर करता येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, अमेरिकी दूतावास व अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्च (ACIR) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रारंभिक टप्प्यातील उद्योगांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. 4 जानेवारी 2021 रोजी या सोसायटीअंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची (Women Entrepreneurship Cell) स्थापना करण्यात आली आहे. स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, महिला उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे, आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे ही या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. पात्र महिला उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago