महाराष्ट्र

सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये  केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात आलेली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत EWS, NCL आणि CVC/TVC मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची,  माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

याबाबत विद्यार्थी व पालक यांची मागणी, कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक असलेल्या संबंधित विविध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रालयात आयोजित करण्‍यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उच्च  तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामायिक परीक्षा कक्षाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सामंत म्हणाले,  विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सन 2021-22 करिता प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम  दिनांकापर्यंत EWS/NC/CVC/TVC बाबतची मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago