महाराष्ट्र

नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत एकनाथ शिंदेंचे मोठं विधान, जाणीवपूर्व हे षडयंत्र…

मुंबई : सोमवारी संध्याकाळी नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात हिंसा आणि जाळपोळ झाली. या हिंसाचारामध्ये ठराविक समाजाला टार्गेट करून त्यांची घरे जाळण्यात आली, तसेच दगडफेकही करण्यात आली. दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ला चढवला ज्यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत, या हिंसाचारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी या प्रकरणावर तपशीलवार भाष्य करत, हिंसाचाराचा निषेध केला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात कडक कारवाईची चेतावणी दिली.

नागपूरच्या महाल, मोमिनपुरा, आणि हंसापुरी भागात हिंसाचार झाला. पोलिसांनी घटनेला नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी केली आणि दोन्ही समाजांमध्ये शांतता प्रस्थापित केली. तथापि, संध्याकाळी आठ वाजता एका मोठ्या गटाने हिंसक वर्तणूक दर्शवली. पाच ते सहा हजार लोकांचा मोठा जमाव एकत्र आला आणि त्यांनी नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी हिंसक कृत्ये केली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावर भाष्य करत म्हटले की, “नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं, पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली आणि दोन्ही समाजांमध्ये शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता दोन पाच हजारांचा मॉप कसा काय जमतो? महाल परिसर, मोमिनपुरा, हंसापुरी या इतर भागामध्ये लोक येतात जमतात. मी टीव्हीवर महिलांच्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. घरामध्ये मोठे- मोठे दगड टाकले. पाच वर्षाचा बच्चू मरता मरता वाचला, हॉस्पिटलमध्ये असलेले देवांचे फोटो जाळून टाकले. तुम्ही आंदोलन करा पण लोकशाही पद्धतीने आंदोलन करा, कायदा हातात घेत विशिष्ट समुदयाला टार्गेट केलं गेलं. संध्याकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये तीन डीसीपी लेव्हलचे अधिकारी जखमी होतात. पेट्रोल बॉम्ब कुठून येतात. दुचाकी आणि चारचाकी जाळल्या, मला एक माहिती मिळाली एका विशिष्ट ठिकाणी रोज १०० ते १५० गाड्या पार्क व्हायच्या तिथे एकही गाडी नव्हती याचा अर्थ जाणीवपूर्व हे षडयंत्र करत काही विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं. लोकांनी आपला जीव मुठीत धरला होता, पोलीस येईपर्यंत धुमाकूळ घातला, पोलीस आल्यावर त्यांच्यावरही हल्ला केला. जे पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालून कायदा सुरक्षेचं रक्षण करतात त्यांच्यावर दगडफेक करता, पेट्रोल बॉम्ब टाकता.”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर 

नागपूर हिंसाचारावर भाष्य करत असताना, शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. शिंदे यांनी यावर तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील सभागृहात बोलत असताना म्हणाले, ‘हर्षवर्धन सपकाळ क्रूर प्रशासक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना आलमगीर औरंगजेबाशी करताय?’, एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले, औरंगजेब हा देशद्रोही होता. औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा मोठा छळ केला. त्यांचे डोळे काढले आणि जीभ छाटली. देवेंद्र फडणवीसांची औरंगजेबसोबत तुलना करताय त्यांनी तुमची जीभ छाटली का? असा संतप्त सवालही यावेळी सभागृहात केला. ‘कोणाची तुलना कोणाबरोबर करताय? शिवाजी महाराज यांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय? तर क्रूर प्रशासक म्हणून औरंगजेबाबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना करताय?’, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर संताप व्यक्त केला तर नाना पटोले यांना उद्देशून शिंदे असेही म्हणाले, ‘नाना… तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य औरंजेबाचं, देशद्रोहाचं समर्थन करतंय म्हणजे तेही देशद्रोही आहेत, त्यांच्यावर खटला दाखल करावा का?’, असा सवाल शिंदेंनी केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago