महाराष्ट्र

जागतिक दर्जाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी घडवावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून काळाची गरज लक्षात घेता शिक्षण संस्थांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. ही ओळख आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत सर्वांगीण विकास होईल यासाठी सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत. आजच्या युगात बुद्धीला आणि गुणवत्तेला महत्व आहे. शाळेचा दर्जा व पायाभूत सुविधा चांगल्या असल्यास त्या शाळेत विद्यार्थी व पालकांचा शिक्षण घेण्याकडे कल असतो. अशा सुविधादेखील उपलब्ध करून द्याव्या लागतील.

प्रास्ताविकात ॲड. कदम म्हणाले, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण दिले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध कंपन्यासोबत करारही केले जाणार आहेत, अशी माहिती देखील ॲड. कदम यांनी दिली.

यावेळी शिक्षण मंडळांतर्गत संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सत्कार करुन गौरव करण्यात आला. सभेला आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago