Drunk Man Climb Up High Tension Electric Tower in Jalna
जालना : पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर एका तरुणाने सासरी जाऊन असा स्टंट केला की सासरच्यांच्या तोंडचे पाणी पळाले. हा तरुण उच्च दाबाच्या वीज टॉवरवर चढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात सोनखेडा-भराडखेडा शिवारात हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश शेळके नावाच्या तरुणाने मद्यप्राशन केल्यानंतर हा सर्व प्रकार केला. काल मंगेश शेळके या तरुणाचे आपल्या पत्नी सोबत भांडण झाले. त्यानंतर संध्याकाळी मंगेश शेळके हा तरुण आपल्या सासुरवाडीत पोहोचला आणि दारूच्या नशेत विजेच्या टॉवरवर चढला. हे बघून गावकऱ्यांना काय करावे सुचत नव्हते. हे दृश्य बघून अनेक जण धास्तावले होते. त्याला टॉवर वरून खाली उतरवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण तो खाली उतरण्यास तयार नव्हता.
अखेर, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तरीदेखील हा तरुण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. चार तास त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आले. मात्र, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…