महाराष्ट्र

सात वर्षांपासून फरार आरोपीचा पाठलाग: अंधारात पोलीस व आरोपी विहिरीत पडले

संगमनेर तालुक्यातील सांगवी गावात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेत सात वर्षांपासून फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी व त्याचा पाठलाग करणारा पोलीस कर्मचारी अंधारामुळे विहिरीत पडले.

घटनेचे सविस्तर वृत्त:
२०१६ साली जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणात आरोपीने आपल्या मामा आणि मामीवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भीतीने आरोपी तेव्हापासून फरार होता, मात्र अधूनमधून तो संगमनेर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असे.

शुक्रवारी आरोपीच्या मोबाइल लोकेशनचा मागोवा घेत पोलिसांनी त्याला अटक करण्याचे नियोजन केले. आरोपी ज्या ठिकाणी लपून बसला होता, त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला.

पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी झाडाझुडपांमधून पळत होता. मात्र अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. त्याच्या मागोमाग पाठलाग करणारा पोलीस कर्मचारीही विहिरीत पडला. पोहता येत असल्याने आरोपीने विहिरीच्या कडेचा आसरा घेतला, परंतु पोलीस कर्मचारी पाण्यात बुडू लागला आणि त्याने आरडाओरडा सुरू केला.

आवाज ऐकून धावलेल्या पोलीस पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर आरोपी आणि पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संपर्क साधला असता संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमने यांनी आपण रजेवर असल्याने घटनेची माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेला दुजोरा दिला असून, विहिरीतून बाहेर काढलेले आरोपी व पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे स्पष्ट केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago