महाराष्ट्र

गृहपयोगी संचाचे वाटप पूर्णतः नि:शुल्क – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. यांच्या मार्फत जिल्ह्यातील 15 वितरण केंद्रांवर होत असलेल्या गृहपयोगी संचाच्या वाटपाबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात त्यांनी हे वितरण पूर्णतः निःशुल्क असून कुणाकडून पैशांची मागणी केल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन त्यांनी केले असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त ग.भा. बोरसे यांनी कळविले आहे.

बैठकीत वितरण केंद्र प्रतिनिधींना संचाचे वाटप मंडळाच्या नियमानुसार पूर्णतः नि:शुल्क करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. केंद्रावर आर्थिक व्यवहार होत असल्यास संबंधित केंद्रावर तातडीने कारवाई करून ते बंद करण्यात येईल, असेही पालकमंत्री यांनी सूचना केल्या.

संच वाटप मंडळाच्या आदेशानुसार भेट पद्धतीने (Appointment System) होणार असून, लाभार्थ्यांनी http://hikit.mahabocw.in/appoinment या संकेतस्थळावर भेट देऊन नियोजित वेळ घेऊन संच मिळवण्यासाठी दिनांक व वितरण केंद्राची निवड करावी लागणार आहे. कामगारांनी ओळखपत्र/आधारकार्ड व नियुक्ती पत्र घेऊन उपस्थित राहिल्यानंतरच संच प्रत्यक्ष दिला जाईल.

कामगारांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही एजंट, संघटना किंवा त्रयस्थ व्यक्तीकडे न वळता थेट मंडळाच्या प्रणालीतून संच मिळवावा. पैशांची मागणी केल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा नियुक्ती पत्रावरील क्रमांकावर तक्रार दाखल करावी.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago