'Diabetes Free Maharashtra' project in the state with the help of Denmark; Health Minister's discussion with Ambassador of Denmark
मुंबई : डेन्मार्कच्या मदतीने राज्यात पुढील वर्षी ‘मधुमेहमुक्त महाराष्ट्र’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबत आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वान यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा केली. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वान यांच्याशी विविध प्रकारच्या सहकार्य कराराबाबतही प्राथमिक चर्चा केली. यावेळी डेन्मार्कचे व्यापार आणि उद्योगमंत्री सोरेन कैनिक, उपमंत्री हेन्री करकेडा, आनंद त्रिपाठी, रुरल डिजिटल हेल्थ अँड फायनान्सचे डॉ. रतिश तागडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत भारत-डेन्मार्क यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रात औषधे, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा विकास आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या तिन्ही क्षेत्रामधे गुंतवणूक करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य व डेन्मार्क यांच्यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यात उच्चस्तरीय बैठक होणार असून दोघांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने सामंजस्य करार करण्याचा दृष्टीने पाऊले उचलली जाणार आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…