Deputy Chief Minister Eknath Shinde consoles Tilak family
पुणे : लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय दीपक टिळक यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, स्वर्गीय दीपक टिळक यांचे पुत्र रोहित टिळक, स्नुषा प्रणति टिळक, मुलगी गीताली टिळक, नातू रौनक टिळक आदी उपस्थित होते.
शिंदे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे दुःखद निधन झाले असून आपल्या सर्वांसाठी ही अतिशय दुःखद घटना आहे. डॉ. टिळक यांनी संपादक म्हणून काम पाहिले असून त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य, मराठी संस्कृतीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्राच्या माध्यामातून दिलेल्या लढ्याचा वारसा टिळक परिवार पुढे नेत आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असेही शिंदे म्हणाले.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…