महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला १५ चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने लातूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त सुमारे १ कोटी २४ लाख रुपये निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. विविध कार्यक्रमांसाठी तुळजापूरकडे रवाना होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

लातूर पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली १५ चारचाकी वाहनांमुळे ‘डायल ११२’ अंतर्गत पूल प्राप्त तक्रारीची दखल घेवून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होणार आहे.

आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यावेळी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago