महाराष्ट्र

ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार

मुंबई : लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराच्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, डॉ. पी. अनबलगन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, किंग्स गॅस प्रा.लि.चे व्यवस्थापक मोहंमद कुरेशी, समीर वहाबे, समीर हमीदे उपस्थित होते.

लिक्विड नॅचरल गॅस हा जीवाश्म इंधनाला एक उत्तम पर्याय असून येत्या काळात हा गॅस अधिक उपयुक्त आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. किंग्स गॅस प्रा.लि. हे राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यात लिक्विड नॅचरल गॅसची निर्मिती, उपलब्धता आणि वापर वाढवण्यासाठी काम करणार आहे. दळणवळण, औद्योगिक क्षेत्रासाठी, सदृढ आर्थिक विकासासोबतच इतर इंधन वापरामुळे निर्माण होणाऱ्या कार्बनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी देखील लिक्विड नॅचरल गॅस सहाय्यक आहे.त्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभागाने हा सामंजस्य करार केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago