महाराष्ट्र

राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे दिली आहे. या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

एकूण अनुदानित 50 महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल असे 562 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 1 जानेवारी 2016 पासून लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत पाठपुरावा केला.

या कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती, रजा, वार्षिक 3% वेतनवाढ आदिबाबत राज्य शासनाची नियमावली लागू रहाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

दि. 1 जानेवारी 2016 पासून 31 मार्च 2019 पर्यंत ही देयके अदा करण्यासाठी सुमारे 52.74 कोटी खर्च अपेक्षित आहे तर 1 एप्रिल 2019 पासून पुढच्या वार्षिक देयकांसाठी 80.64 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाने या प्रस्तावास एकमुखी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago