cm uddhav thackeray praises pointsman mayur shelke who saved child on vangani railway track
मुंबई : रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले.
मयुरच्या शौर्याची दखल थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली व कौतुक केलं. “माझ्याकडे शब्द नाहीत.. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलात. आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील.” अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले होते. मध्य रेल्वेने त्याला 50 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करत सन्मानित केलं.
मयूर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाषण :
उद्धव ठाकरे : जय महाराष्ट्र
मयुर शेळके : जय महाराष्ट्र साहेब
उद्धव ठाकरे : तुमचा थरारक व्हिडीओ पाहिला.. बापरे
मयुर शेळके : धन्यवाद साहेब धन्यवाद
उद्धव ठाकरे : नाही नाही, हे म्हणजे… माझ्याकडे शब्द नाहीत.. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलात. आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील.
मयुर शेळके : नक्कीच… धन्यवाद साहेब
उद्धव ठाकरे : नीट काळजी घ्या, तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत… कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही
मयुर शेळके : तुमच्या कौतुकाने नक्कीच मला कुठेतरी अभिमान वाटतोय. तुम्ही वेळात वेळ काढून माझं कौतुक केलंत
उद्धव ठाकरे : तसंच काम केलंत तुम्ही
मयुर शेळके : तुम्ही कोव्हिड काळात समाजासाठी जे काम करताय, त्याच्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळते.
उद्धव ठाकरे : नक्कीच आपण सगळे चांगलं काम करु, नीट राहा, जय महाराष्ट्र
मयुर शेळके : जय महाराष्ट्र साहेब.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…