महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनर्वसित इर्शाळवाडीला भेट, पुनर्वसित विद्यार्थ्यांना नोकरी तर महिलांना देणार रोजगार

रायगड : इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सिडकोमार्फत या दरडग्रस्तांच्या 44 घराचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणी कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात या घराचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे दौरा आटोपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी इर्शाळवाडी पुनर्वसन कामाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, सिडको अधिकारी गणेश देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जुलै 2023 साली खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली होती. अनेकजण मृत्यू पावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाल वाडीला भेट देऊन तात्काळ पुनर्वसन करण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते. जवळपास वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून चालू असलेले बांधकाम पूर्ण झाले असून येथे 44 घरांची बांधणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी इर्शाळवाडी येथील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना सिडकोच्या माध्यमातून नोकरीवर घेण्याचे आदेश सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून येथील महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचे देखील कबूल केले. तसा फोनही त्यांनी उद्योगमंत्र्यांना केला असून उद्योग खात्याचे अधिकारी संबंधित गावाला भेट देऊन तेथील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे देखील सांगितले.

इर्शाळवाडी येथे नव्याने उभारलेल्या घरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर येथील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago