महाराष्ट्र

कुळगाव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेरसर्वेक्षणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे तसेच नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमएमआरडीएचे सहआयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच बदलापूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.

बैठकीत बदलापूर गावठाणाबाबतचा फेरबदल करून विकास योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली. कुळगाव-बदलापूरमधून जाणाऱ्या उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेबाबत ज्या-ज्या भागातील तक्रार असेल, त्याठिकाणी नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय बदलापूर नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या ५३ कोटींच्या विविध विकास कामे, प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. गेली काही वर्षे नगरपरिषदांना द्यावयाचे मुद्रांक शुल्काचे अनुदान थकित आहे. हे अनुदान देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले. बदलापूर नगरपरिषदेकडील अभियंता तसेच अनुषंगिक रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago