Chief Minister Eknath Shinde
मुंबई : सततचे दौरे आणि सभा यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुंबईत येऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, बैठका, भाषणं, पत्रकार परिषदा असे सर्व वेळापत्रक आहे. गेल्या महिनाभरात रात्री-अपरात्री झालेले दिल्लीचे दौरे, पंढरपूर वारी, महाराष्ट्र दौरा यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला असून त्यांना थकवा जाणवत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…