try to get immediate help to the affected farmers
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवुन देण्यास प्रयत्न करणार असल्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांचे नुकसान, जीवतहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रस्ते, पुल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा प्रस्ताव देखील सादर करावा. तसेच मुख्य रस्त्यांच्या बाजुला झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची कार्यवाही करावी. पावसाळयाचे दिवस लक्षात घेता रोगराई टाळण्यासाठी रस्त्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणुक करावी. जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा असेही निर्देश महसुल राज्यमंत्री यांनी दिले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…