छत्रपती संभाजी नगर

मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजागाराभिमुख करण्याचा मानस – कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

औरंगाबाद : प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यांना मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून याप्रकारचे मेळावे यापुढेही आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. कौशल्यपूर्ण रोजगाराचे शिक्षण देऊन मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजगाराभिमुख करण्याचा मानस लोढा यांनी बोलून दाखविला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दोन दिवसीय प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, अप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन श्री. लोढा यांच्याहस्ते झाले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मेळाव्यास सुरूवात झाली. औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या. याचप्रमाणे या मेळाव्याच्या ठिकाणी स्टार्टअप प्रदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन आणि करीअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सर्वश्री आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा, उप सचिव श्रीमती भरोसे, आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह, संचालक दिगंबर दळवी, उपायुक्त सु. द. सैंदाणे, सहायक आयुक्त सुरेश वराडे आदी उपस्थित होते.

राज्यात आगामी दोन वर्षात पाच लाख उमेदवारांना रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. कौशल्य पदवी प्रदान सोहळ्यात सर्व मान्यवरांनी पदवी दीक्षांत पोशाख घालून उमेदवारांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले. प्रातिनिधिक स्वरूपात परम स्किल्स यांच्यामार्फत रुचा इंजिनिअरिंग इंड्यूरंस टेक्नॉलॉजी या कंपनीत अप्रेंटीसशिप म्हणून निवड झालेल्या पाच उमेदवारांना मंत्री लोढा यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर देऊन विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा डॉ. कराड, आमदार बागडे यांनी व्यक्त केली. मेळाव्याप्रसंगी श्रीमती वर्मा यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. कुशवाह यांनी आभार मानले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago